पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Fire | आकुर्डी येथे अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या कारखान्याच्या जवळच एक शाळा असून, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शाळेतील सुमारे 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आगीची ही घटना आकुर्डी (Pimpri Fire) येथील पांढरकरनगर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकरनगरमधील अगरबत्तीच्या कारखान्याला अचानक आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारी असलेल्या पत्राशेडच्या घरांना याची झळ बसून नुकासान झाले. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेजवळ मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी आग लागल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाला दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात आग लागली असून,
अगीचे लोट व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
Web Title :- Pimpri Fire | fire at agarbatti company adjacent to akurdi school 400 students were expelled
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझ्यासारखी सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापरिनिर्वाणदिनी ग्वाही
Pune Crime | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 88 जणांवर कारवाई
Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका