पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – कंपनीत काम करणार्या एका तरुणाच्या पॅन कार्ड व आधार कार्डचा वापर करुन त्याद्वारे बनावट कागदपत्रे तयार करुन तब्बल ८ फायनान्स कंपन्यांमधून परस्पर कर्ज काढून Fraud फसवणूक Fraud केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी रनजॉय बनर्जी (वय ३५, रा. सूस रोड, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२१ दरम्यान घडला आहे.
बॅनर्जी हे एका कंपनीत काम करतात. ते कंपनीत असताना त्यांना विमाननगर येथील एलरी सलरी फायनान्स कंपनीतून फोन आला. तुम्ही आमच्या कंपनीतून कर्ज घेतले असून त्यांचा हप्ता भरलेला नाही.
तेव्हा त्यांनी मी कोणत्याही फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले नसल्याचे सांगून फोन कट केला.
त्यानंतर त्यांनी बँकेत काम करणार्या आपल्या पत्नीला फोन करुन हा प्रकार सांगितला.
त्यांच्या पत्नीने त्यांचा बँक सिव्हिल स्कोअर तपासला.
तेव्हा त्यांचे पॅन कार्ड व आधार कार्ड वापरुन कोणीतरी वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्याचे लक्षात आले.
त्यानंतर बॅनर्जी यांनी तपास केल्यावर त्यांना धनवर्षा, केजीबी, एलरी सलरी, इंडिया फायनान्स, डी. एम. आय. फायनान्स, व्हि. व्हि़. फायनान्स, चैतन्य रुलर अशा दिल्ली, उत्तर प्रदेश, हैदराबाद येथील ८ फायनान्स कंपन्यांमधून बॅनर्जी यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरुन त्यावरील त्यांचा फोटो व पत्ता बदलून त्या ठिकाणी दुसर्याचा फोटो व पत्ता वापरुन ८ लाख २२ हजार ६८६ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले.
हा सर्व प्रकार पाहून बॅनर्जी चक्रावून गेले असून हिंजवडी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूकीचा हा प्रकार लक्षात घेता आपल्या आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स देताना काळजी घ्या.
कोणत्या कारणासाठी आपण झेरॉक्स देतो, याचा उल्लेख त्यावर करण्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कृपया हे देखील वाचा:
व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत
FIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्या 2 हॉस्पीटलवर FIR
Coronavirus : मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर