पिंपरी न्युज (Pimpri News) : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Crime News |कर्नाटका (Karnataka) तून काम धंद्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी बलात्कारा (Rape minor girl) तून गर्भवती (Pregnant) राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साधारण तीन महिन्यांपूर्वी कर्नाटका (Karnataka) तील रायचूर येथील गोरबाल तांडा (Gorebal Tanda) येथे घडली आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने वाकड पोलिसां (Wakad police) कडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची १२ वर्षाच्या मुलीची वैद्यकीय तपासणी (medical check up) केली असताना ती गर्भवती (Pregnant) असल्याचे आढळून आले. त्यावर तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. ही मुलगी सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुळ गावी आजीबरोबर रहात होती. त्यावेळी एकेदिवशी एक जण अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यांच्या घरात शिरला. या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. अंधारामुळे ही मुलगी त्याला ओळखू शकली नाही. आता हा प्रकार उघड झाला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा रायचूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
web title: Pimpri Crime News | 12-year-old girl remains pregnant after rape; FIR lodged at Wakad police station.
Gold Price Today । चांदी 70 हजारच्या पुढे, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर