पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Crime | इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम आता लोकांच्या मोबाईलवरही असल्याने पार्लरमध्ये खेळायला जाणार्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे आता त्याचा वापर जुगारासाठी होत असल्याचे समोर आले आहे. भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) तीन ठिकाणी छापे टाकून हा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेमद्वारे मशीनवरील आकडे लावण्याचा जुगार सुरु असल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी 30 मशीन जप्त केल्या असून 11 जणांवर गुन्हे (Pimpri Crime) दाखल केले आहेत. भोसरीतील केएसबी चौकाजवळील शाहूनगर येथील वैभव कॉम्प्लेक्समधील सत्यम मार्केट (Satyam Market) आणि मोशीतील (Moshi) ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे हा जुगार सुरु होता. तेथे एक रुपयाला 30 रुपये असा दर होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिडिओ गेम पार्लर चालक अभिजित राजेंद्र सोळंके (वय 32, रा. काळेवाडी फाटा, वाकड), कामगार सुरेश महादु ठाकूर (वय 51, रा. कुदळवाडी), जुगार खेळणारा अमोल दिलीप वायकर (वय 29, रा. चिखली) तसेच व्हिडिओ गेम पार्लर मॅनेजर अजित संभाजी जाधव (वय 21, रा. मोहननगर, चिंचवड), कामगार आदेश बाळाजी जाधव (वय 20, रा. दत्तनगर, निगडी), जुगार खेळणारे नितीन ज्ञानोबा मोरे (वय 40, रा. चिखली), सागर विजय महापुरे (वय 35, रा. दत्तनगर, चिंचवड) आणि किरण विठ्ठल साळुंखे (वय 26, रा. मोहननगर, चिंचवड) तसेच बाळगोंडा पायगोंडा पाटील (वय 40, रा. मरकळ), दिनेश सूर्यभान भोळे (वय 27, रा. कुरुळी, ता़ खेड), श्रीनिवास चंद्रकांत त्रिबंके (वय 28, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़.
शाहूनगरमधील सत्यम मार्केटमधील गाळा नंबर 5 व 6 येथे इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीनवरील
आकड्यावर पैसे लावण्यास सांगून जिंकल्यास 1 रुपयाला 30 रुपये दिले जात होते. पोलिसांनी येथे
छापा घालून दोन्ही ठिकाणची 20 व्हिडिओ गेम मशीन व रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच मोशी येथील ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे व्हिडिओ गेम मशीनवर 1 रुपयाला 15 रुपये या
दराने जुगार चालविला जात होता.
Web Title :- pimpri crime gambling begins with electronic video games bhosari police raided three places and seized goods worth rs
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे
Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही