पिंपरी न्यूज : (Pimpri Crime) : बहुजननामा ऑनलाईन – थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचार्याच्या अंगावर कुत्रा सोडण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चाकण पोलिसांनी (Chakan Police) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खेड तालुक्यातील शेलगाव येथील दाम्पत्यावर गुन्हा (Pimpri Crime) दाखल केला आहे. Pimpri Crime | Dogs left on MSEDCL employee who went to cut off power supply
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अश्विनी विनोद दुधावडे व विनोद राजेश दुधावडे (रा. शेलगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शेलगाव येथे राहणार्या एका २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आरोपी यांना वारंवार समज देऊन महावितरणाची (MSEDCL) थकबाकी भरण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ती भरली नाही. त्यामुळे फिर्यादी या १३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेल्या होता. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर दगड फेकून मारला आणि कुत्रे अंगावर सोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलीस उपनिरीक्षक झेंडे अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pimpri Crime | Dogs left on MSEDCL employee who went to cut off power supply
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update