पिंपरीन्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Crime |हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिंचवड येथे मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. योगेश अनंता गायकवाड (वय-25 रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यातील (Chinchwad Police Station) पोलीस शिपाई निवास धनंजय विधाटे (Nivas Vidhate) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी योगेश गायकवाड याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशने त्याच्याजवळ विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला.
आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला, असे मोठ्याने ओरडत त्याने हवेत कोयता फिरवला.
लोकांना धमकी देत हनुमान स्वीटच्या दिशेने जात होता.
त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
याची माहिती मिळताच चिंचवड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
Web Title : Pimpri Crime | Chinchwad Police arrest one.