पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरीमध्ये (Pimpri Crime) ब्रिटिशकालीन (British) ‘बॉम्ब’ (bomb) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीत उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी (Pimpri Crime) घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी येथील क्रोमा सेंटर (Chroma Center Pimpri) जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. क्रोमाच्या पाठीमागे असलेल्या कोहिनूर सोसायटीमध्ये (Kohinoor Society) गार्डनमध्ये खोदाईचे काम सुरु आहे.
खोदाई करत असताना मजुरांना बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आली.
याची माहिती पिंपरी पोलिसांनी मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सध्या या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले आहे.
पथकाकडून बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु आहे. हा बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे (Assistant Commissioner of Police Sagar Kavade) हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात नागरिकांना येण्यास मनाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title : Pimpri Crime | British bomb found in Pimpri commotion in the area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी
Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल