पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दैनंदिन रुग्ण संख्या ही हजारांच्या पुढेच आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 1125 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3570 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 002 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1125 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 042 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 30 हजार 192 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरात 15,012 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 15,012 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 437 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 14,575 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 3570 patients were ‘corona free’, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Baldness | टक्कल पडण्याची समस्या का होते? जाणून घ्या याची कारणे आणि बचावाच्या पद्धती
Hypertension | ‘या’ 7 पद्धतीने ‘हाय ब्लड प्रेशर’चा धोका कमी करू शकतो जास्वंदीच्या फुलाचा चहा !
Egg Freezing | प्रेग्नंट होण्यासाठी कशी केली जाते प्रक्रिया, जाणून घ्या याबाबत सविस्तर