पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Updates) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 हजार 491 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 431 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3491 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 561 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 05 हजार 164 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 28,580 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 566 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28 हजार 014 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील तीन रुग्णांचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title : Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad 3494 patients have been released corona find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार
- Padma Bhushan Award | सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार
- Control Uric Acid | यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यात उपयोगी मानले जातात ‘हे’ ड्रायफ्रुट्स, जाणून घ्या