पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 3 हजार 537 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 824 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 274 ॲक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 28 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 246 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.4) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 4 हजार 668 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 35 हजार 046 जणांना लस देण्यात आली आहे
Web Title :- Pimpri Corona Update | Large decline in daily patient population in Pimpri Chinchwad know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Shane Warne Passes Away | ऑस्ट्रेलियाचा महान फीरकीपटू शेन वॉर्नचं हदयविकाराच्या झटक्याने निधन
Health Benefits | दूधासोबत ‘या’ वस्तूंच्या सेवनाने आरोग्याचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कारण