पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आज शहरात एकाही ओमायक्रॉनबाधित (Omacron) रुग्णाची नोंद झालेली नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 3 हजार 589 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 882 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 781 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 209 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 33 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 176 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.06) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 4 हजार 393 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 42 हजार 901 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | 48 patients of ‘Corona’ discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gajanan Marne | कुख्यात गजानन मारणेची जेलमधून वर्षभरानंतर सुटका; जाणून घ्या प्रकरण
Narayan Rane | ‘त्या’ प्रकरणात नारायण राणे, नितेश राणेंची 9 तास चौकशी
Gold Price | सोन्याची जोरदार वाटचाल, मे 2021 नंतर दिसून आली सर्वात मोठी साप्ताहिक तेजी