पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 165 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद (Pimpri Chinchwad Corona) झालेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 165 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 471 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 58 हजार 076 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 062 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.25) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 7 हजार 692 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 77 हजार 883 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | Pimpri Chinchwad middle Galya 24 Tasat ‘Corona’ from 165 newly sick, Janoon Gya other figures
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update