पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 140 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 140 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 335 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 761 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 1439 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1439 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 19181 जणांचे लसीकरण
रविवारी (दि.29) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 19,181 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 14 लाख 29 हजार 897 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | Discharge of 168 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 247 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी