पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 65 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 588 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये सध्या 377 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 13 हजार 961 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 29 लाख 06 हजार 093 जणांना लस देण्यात आली आहे.
Omicron Covid Variant | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कठोर निर्बंध लागणार?
Benefits Of Filing ITR | ‘इन्कम टॅक्स’च्या कक्षेत नसाल तरीही दाखल करा ITR, मिळतात अनेक फायदे