पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 96 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 96 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 74 हजार 961 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 70 हजार 359 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 869 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 869 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
दिवसभरात 10,819 जणांचे लसीकरण
मंगळवारी (दि.12) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 10,819 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 21 लाख 07 हजार 947 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 96 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics
BJP MLA Madhuri Misal | तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच – आमदार माधुरी मिसाळ
Milind Soman | शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?
Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी