पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 84 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 84 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 419 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 227 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1294 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहराबाहेरील 2 रुग्णाच्या मृत्यूची तर शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4397 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 5008 जणांचे लसीकरण
सोमवारी (दि.30) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5 हजार 008 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 14 लाख 34 हजार 905 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 84 new corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours 227 discharged
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा
Satara Crime | लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं शोले स्टाईलनं आंदोलन करत केला आत्महत्येचा प्रयत्न
Jayant Patil | ‘वाझे प्रकरणात ‘1 नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच