पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | ऑनलाइन टीम पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (गुरुवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 79 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 79 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 502 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 68 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 835 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 944 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 3 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.7) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 09 हजार 080 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 20 लाख 51 हजार 603 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 79 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Narayan Rane | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंना स्थान नाही; चर्चेला उधाण