पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 73 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 73 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 523 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 165 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 068 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 754 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 754 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 7117 जणांचे लसीकरण
सोमवारी (दि.27) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 7,117 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 18 लाख 87 हजार 157 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 73 new patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics
Amravati Crime | धक्कादायक ! 15 वर्षीय मुलीवर गावातल्याच तरुणाने केला अत्याचार
Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ