पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची संख्या तिनशेच्या आत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा (Recover Patient) नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 227 नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 227 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 613 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 57 हजार 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 276 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
शहरात 1112 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1 हजार 112 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात 3,614 जणांचे लसीकरण
मंगळवारी (दि.20) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर (Private Covid-19 Vaccination Center) लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 03 हजार 614 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 45 हजार 796 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | 227 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pimpri Chinchwad, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update