पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) आज (मंगळवार) नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 151 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 151 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 67 हजार 404 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 62 हजार 049 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 974 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 974 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4381 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 16,854 हजार जणांना लस
मंगळवारी (दि.17) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 16 हजार 854 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 61 हजार 925 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 151 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये 446 रूपयांची वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर