आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 271 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 149 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 572 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. (Pimpri Corona)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये सध्या 484 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 241 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 243 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona | 149 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी असी घ्यावी डोळ्यांची काळजी
Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !