पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज दिवसभरात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 581 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 8 रुग्ण शहराबाहेरील आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4861 इतकी झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज दिवसभरात 363 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरामध्ये शहरातील 573 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहराबाहेरील 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांच्यासह 104 जणांवर पिंपरी चिंचवडमध्ये उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील 67 जणांचा मृत्यू झाला असून आज हद्दीबाहेरील 1 रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या 99 इतकी झाली आहे.
शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 363 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2906 रुग्ण बरे झाले असून या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 1863 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 11 जणांवर पुणे शहरात उपचार सुरु आहेत. आज मृत झालेला रुग्ण खेड येथील 55 वर्षीय पुरुष आहे.