Pimpri Chinchwad Police Nakabandi | दीड वर्ष सांभाळ केलेल्या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेची मुलांशी घडवली भेट; नाकाबंदी अशीही होते आनंदी

पिंपरी : Pimpri Chinchwad Police Nakabandi | नाकाबंदी ही अनेकांना त्रासदायक वाटत असते. वेळ जातो, पोलीस कारण नसताना चौकश्या करतात. झडती घेतात, असे वाटत असते. पण, या नाकाबंदीतून अनेक गोपनीय बाबी समोर येत आहे. मोटारीत कोट्यावधी रुपये सापडले तरी ते आपले नसल्याचे लोक सांगतात. पण अशाच एका नाकाबंदीमुळे एका हरविलेल्या वृद्ध महिलेला तिचा मुलगा मिळाला.
आय टी पार्क चौकात कॉर्नरला एका हातगाडीवर गेल्या दीड वर्षापासून एक ८० वर्षाची वृद्ध महिला रहात होती. तिला आपल्याविषयी काही सांगता येत नव्हते की ती कुठ राहणारे हे तिला समजत नव्हते. तळवडे वाहतूक पोलीस, चाकणकडे जाणारे कामगार व इतर या महिलेला कपडा लत्ता, जेवण देऊन संगोपन करत होते. नाका बंदी दरम्यान पोलिसांनी या चौकात एका वाहन चालकाला थांबविले. त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच त्याचे लक्ष या महिलेकडे गेले. त्याने या महिलेला ओळखले व तिच्या मुलाचा मोबाईल नंबर दिला. पोलिसांनी या मुलाला बोलावून घेतले़ आणि तब्बल दीड वर्षांनी आई मुलाची भेट झाली.
गौतम आकाराम वानखेडे (वय ३९, रा. जय अंबेनगर, शेगाव जि. बुलढाणा) व त्यांची आई लक्ष्मी आकाराम वानखेडे (वय ८०) अशी या दोघा माय लेकरांची नावे आहेत.
गौतम वानखेडे हे आळंदी देवाची येथे रहायला आले. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांची आई लक्ष्मी वानखेडे हरविल्या. त्यांच्या आईचा फोटो नसल्याने आई हरविल्याबाबतची तक्रार नोंद केली नव्हती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुळ गावी आणि आळंदी, पुणे परिसरात आईचा तीन ते चार महिने खूप शोध घेतला. परंतु त्या मिळाल्या नाहीत.
दरम्यान, लक्ष्मी वानखेडे या आळंदी देवाची येथून तळवडे येथे आल्या होत्या. त्या आय टी पार्क चौकातील कॉर्नरला असलेल्या एका जुन्या हातगाडीला त्यांनी आपले घर बनविले. येणारे जाणारे कामगार, तळवडे वाहतूक पोलीस त्यांना मदत करत होते. नाकाबंदीत अडविलेल्या एका वाहनचालकाने त्यांना ओळखले व मुलाचा मोबाईल नंबरही दिला. त्यावरुन मुलाची व आईची पोलिसांनी भेट घडवून दिली.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात, हवालदार राजू भोसले व इतर पोलीस अंमलदार यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरीमुळे आई व मुलांचे मिलन घडून आले.
Comments are closed.