पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad News | नातेवाईकांना घेऊन येऊन सुनेने इमारतीबाहेर पार्क केलेल्या कारवर दगड, सिमेंटचे गट्टे, लोखंडी रॉडने काचा फोडल्या तसेच दरवाज्यावर दगड मारुले व सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्याची तक्रार सासुने केली आहे. यावरुन चिखली पोलिसांनी सून नम्रता धनराज कर्पे (रा. चिखली), मयुर बनकर, राहुल बनकर, अजय बनकर, संजय बनकर, अप्पा गोरे, पांडुरंग वाडकर (सर्व रा. उरळी कांचन) अशी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी निर्मला मधुकर कर्पे (वय ५६, रा. देहु आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली. फिर्यादी या घरी झोपलेले असताना त्यांच्या घराच्या बाहेर मोठमोठ्याने आरडा ओरडा करण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांची सून नम्रता कर्पे व तिचे नातेवाईक बाहेर उभे होते.
त्यांच्या हातात सिमेंटचे गट्टु व लोखंडी रॉडने गेटचे लॉक तोडून ते सर्व जण बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आले. त्यांनी पार्किंगमध्ये उभी असलेली वॅगनर कारवर दगड, सिमेंटचे गट्टु, विटा व लोखंडी रॉडने गाडीचे पाठीमागे, समोरील बाजूच्या काचा, पाठीमागील दोन्ही टेललॅम्प, बोनेटवर मारुन नुकसान केले. तसेच त्यांच्या हातातील दगडांनी दरवाजावर मारुन तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ८० ते ९० हजारांचे नुकसान केले.
web title: Pimpri-Chinchwad News | With the help of relatives, daughter in law broke the car, mother in law complained
Flying Sikh | फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली
Pimpri-Chinchwad News | लग्नाचे आमिष दाखवून नंतर जातीचे कारण सांगणार्यास पोलिसांनी केली अटक