पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी (Pimpri) परिसरात घडला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाची विचारणा केल्यावर तिला तु खालच्या जातीची असल्याचे सांगून नकार देणार्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या(Filed an offense under the Prevention of Atrocities Act)खाली गुन्हा दाखल केला आहे.
संतोष रामदास शिवेकर (वय २९, रा. करंजविहिरे, ता. खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हा प्रकार जून २००९ पासून १६ मे २०२१ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मागासवर्गीय असल्याचे आरोपी संतोष शिवेकर याला माहिती होते. असे असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरी तसेच चाकण, खेड येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध केले.
त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने ती खालीच्या जातीची असल्यामुळे त्यांच्याशी लग्नास नकार दिला. शेवटी तिने चाकण पोलिसां(chakan police)कडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संतोष शिवेकर याला अटक केली आहे.
web title: Pimpri-Chinchwad News |The police arrested the person who was showing the lure of marriage and then giving the reason of caste
Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 318 रुग्ण ‘कोरोना’मुक्त
Bhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळयातील 8 आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी