पिंपरी चिंचवड : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांची बदली झाली असून त्यांच्या जागी स्मिता झगडे (Smita Jagade) यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश (Transfer orders) होऊन सात दिवस उलटले. तरी देखील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रिक्त आहे. झगडे यांना आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांनी रूजू करून न घेतल्यामुळे पालिका वर्तुळात झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली, अशी चर्चा होत आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation )
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव (Deputy Secretary) प्रियांका कुलकर्णी-छापवाले (Priyanka Kulkarni-Chapwale) यांनी 13 सप्टेंबर 2022 रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाबाबत आदेश काढले. या आदेशाप्रमाणे विकास ढाकणे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली. त्यांच्या जागी महापालिकेत कार्यरत असलेल्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
या आदेशानंतर सात दिवसे उलटले आहेत. तरी देखील झगडे यांना अतिरिक्त आयुक्तपदावर रूजू करून घेण्यात
आलेले नाही. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रूजू न करून घेतल्याने पालिका वर्तुळात उलट सूलट चर्चा होत आहे.
झगडे यांची बदली शिंदे गटामार्फत (Shinde Group) झाली असून शहर भाजपमधील काही पदाधिका-यांचा झगडे यांना विरोध आहे.
त्यांनी त्यांची नियुक्ती रोखली आहे.
त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी झगडे रूजू होणार की त्यांच्याजागी आणखी दुस-या कोणाची वर्णी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pimpri Chinchwad Municipal Corporation | Post of Additional Commissioner of Pimpri Municipality vacant even after seven days; Who blocked the appointment of Smita Jagde?
हे देखील वाचा :
Rupee Co Op Bank | रुपी बँकेच्या दोषी संचालक, अधिकार्यांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका
Basil Seeds | तुळशीची फक्त पाने नाही तर बियांमध्ये सुद्धा दडलाय आरोग्याचा खजिना, अनेक आजार होतील दूर