पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 171 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 136 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 171 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94 हजार 948 वर पोहचली आहे. आज 136 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 91 हजार 609 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
गेल्या 24 तासामध्ये शहरात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पालिका हद्दीतील आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चिंचवड, थेरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2436 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1726 शहरातील तर 710 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 714 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालिका हद्दीबाहेरील 102 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 104 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.