पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 120 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 110 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 120 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 728 वर पोहचली आहे. आज 1110 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 93 हजार 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
गेल्या 24 तासामध्ये शहरात मनपा हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण चिंचवड मधील रहिवाशी आहे. आतापर्यंत शहरात 2488 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1757 शहरातील तर 731 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 579 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 57 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 30 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इंग्लंडहून आलेले 7 प्रवाशी पॉझिटिव्ह
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 14 प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत. तर 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरीत 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 173 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 8 अहवाल सध्या प्रलंबित आहे.