पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या तिनशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) 218 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 06 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 218 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 57 हजार 506 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 275 रुग्ण कोरोनामुक्त (Recover) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी (Discharge) सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 52 हजार 085 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 1138 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1 हजार 138 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत. शहरामध्ये (PCMC) रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात 06 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 04 रुग्ण शहरातील (PCMC City) आहेत. तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4283 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 10 हजार जणांना लस
मंगळवारी (दि.29) शहरामध्ये 39 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 21 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर (Private Covid-19 Vaccination Center) लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 10 हजार 274 जणांना लस देण्यात आली आहे.
यामध्ये खासगी लसीकरण केंद्रावर 5854 तर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर 4420 जणांनी लस घेतली.
आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 46 हजार 03 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates 151
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Atul Bhatkhalkar । ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का ?, भाजपचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल