पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 542 नवीन कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 175 कोरोना Coronavirus बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनंतर कमी आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 520 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 276 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 40 हजार 046 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 5 हजार 222 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 31 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 19 रुग्ण शहरातील आहेत. तर 12 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4008 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.27) शहरामध्ये 62 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात 2373 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 89 हजार 556 जणांना लस देण्यात आली आहे.