बहुजननामा ऑनलाइन टीम – लाच घेण्यात पोलीस खातं अव्वल असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात येत असताना देखील काही महाभाग वेगवेगळ्या पद्धतीने लाचेची (Bribe) रक्कम स्विकारत आहेत. वाहतूक नियमनासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ( women traffic police)वाहन चालकांसह पोलिस या सीसीटीव्हीच्या निगराणीत येत असतात. असे असताना पोलिसांकडून वाहनचालकांकडून लाच घेतली जाते. असाच एक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला असून एक महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) वाहनचालकाकडून खिशात लाच स्विकारत असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पिंपरीतील शगुन चौक आणि साई चौकात बेशिस्त वाहन चालकांवर वाहतुक पोलिसांकडून कारवाई केली जाते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ शगुन चौकातील आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीलकडून लाच स्विकारली. एवढेच नाही तर लाचेची रक्कम पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले. रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रीत केला आहे.
नेमके काय घडलं
पिंपरीतील शगुन चौकातून स्कूटरवरून विना हेल्मेट जाणाऱ्या एका तरुणीला महिला वाहतूक पोलिसांनी रोखले होते. त्यांच्याकडे रितसर चौकशी करण्यात आली आणि दंडही सांगण्यात आला. या तरुणीने हेल्मेट न घातल्यामुळे महिला वाहतूक पोलिसाने कारवाई केली होती. पण, पावती न फाडता ‘काही तरी घ्या’ असं म्हणून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न तरुणीने केला. तरुणीने वाहतूक पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हो नाही म्हणत महिला पोलिसाने लाचेची रक्कम पॅन्टच्या खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने पैसे थेट पॅन्टच्या मागील खिशात ठेवून ती निघून गेली.
संबंधित महिला पोलिसावर कारवाई करणार
महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. संबंधित महिला वाहतूक पोलिसाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच हा व्हिडीओ पिंपरीतील शगुन चौकातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.