बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता युवानेते प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हेही पूज्यनीय आहेत असे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे देसाई यांच्या कार्यालयात लावलेला आदित्य ठाकरेंचा फोटो.
परळीत सिरसाळा येथे पंचतारांकित #MIDC उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय! MIDCसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश उद्योगमंत्री @Subhash_Desai यांनी दिले. परळीच्या औद्योगिक विकासाची वाटचाल सुरू. प्रयत्नांना यश आले. समाधान वाटतंय. pic.twitter.com/qpV1Hd1EEQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 22, 2019
उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजुला आदित्य ठाकरेंचा फोटो आहे. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांसाठी आदित्य ठाकरे बाळासाहेबांप्रमाणे पुज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने त्यांनी शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चर्चा केली. या बैठकीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत सुभाष देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसत आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार म्हणून निवडून आले आहे. तसेच ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठकींना आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. आता आदित्य ठाकरे यांचे स्थान आणखीच उंचावल्याचे दिसत आहे.