मनिला : वृत्तसंस्था – फिलिपिन्स या दक्षिण-पूर्व आशियाई देशातील 13 वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने 48 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केले. त्या व्यक्तीचे हे पाचवे लग्न होते आणि आता त्या मुलीला स्वतःच्या वयाच्या मुलांचे पालन करावे लागत आहे. मुस्लिम बहुल मॅगुइंदनाओ प्रांतात मोठ्या संख्येने कुटुंबातील सदस्य आणि मित्र लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर, अल्पवयीन वधूला तिच्या पतीच्या मुलांचे पालन करावे लागत आहे, त्यातील काही मुलं तिच्या वयाची आहेत.
लग्नानंतर, वर अब्दुलरजाक अम्पाटुआन म्हणाले की, पत्नीला पाहून मला आनंद झाला आहे आणि तिच्या सोबत मिळून मुलांचा सांभाळ करेल. हे लग्न वराच्या घरी झाले जिथे त्याला प्रथम एक चांगला पती होण्याचा उपदेश दिला गेला. यानंतर अब्दुलरजाक ढोल-ताशांच्या गजरात दुल्हनच्या घरी पोहोचला. यानंतर दोघांनी लग्न केले आणि तिथे उपस्थित लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला.
लग्नानंतर मुलीने सांगितले की, ‘मी त्यांना (तिच्या पतीला) घाबरत नाही कारण तो मला आवडतो. मी आता स्वयंपाक करण्यास शिकत आहे कारण आता मला हे काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. मला माझ्या पतीला आनंदी ठेवायचे आहे. ‘या लग्नाच्या तीन आठवड्यांनंतर, अब्दुलरजाक यांनी आपल्या पत्नीसाठी एक छोटेसे घर बांधले आहे जेथे ते दोघे मुले घेऊन राहत आहेत.
अब्दुलरजाक व्यवसायाने एक शेतकरी आहे आणि त्याची नवीन पत्नी आता घरकाम करत आहे. तसेच पूर्वीच्या बायकापासून झालेल्या मुलांची काळजी घेत आहे. अब्दुलरजाक यांनी असा दावा केला आहे की, त्यांची नवीन पत्नी 20 वर्षांची होईपर्यंत तिला मुले होणार नाहीत. तसेच, तो आपल्या नवीन पत्नीला पैसे देईल जेणेकरून ती तिचे शिक्षण पूर्ण करू शकेल. या मुस्लिमबहुल क्षेत्रात, मुले वयाच्या 15 व्या वर्षी विवाह करू शकतात आणि मुली तारुण्यात येताच त्यांचे लग्न केले जाते.