नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण यंत्रणा प्रवर्तन संचालनालयाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तसेच सीएए विरोधात आंदोलन सुरु ठेवण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनने १४४ कोटींचा निधी दिला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. एजन्सीने पीएफआयसोबत संबंधित काही प्रकरणांची नुकतीच चौकशी केली असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनशी संबंधित सुमारे ७३ बँक खाती मिळाली असून त्यात निषेधाच्या वेळी संशयास्पद मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला आहे.
देशातील अनेक बड्या वकिलांनी पीएफआयच्या बँक खात्यातून पैसे देण्यात आल्याची माहिती मिळत असून यामध्ये कपिल सिब्बल आणि इंदिरा जयसिंग यांची नावे आहेत. दोन ते तीन दिवसात १२० कोटी रुपये जमा झाल्यावर ते लगेच काढून घेण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. तसेच पीएफआयकडून आणखी बड्या वकिलांना पैसे पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली असून सीएए विरुद्ध युपीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनामागे पीएफआयचा हात असल्याचे सांगितले जात आहे. पीएफआयच्या २५ सदस्यांना राज्यातील अनेक भागात दंगा आणि तोडफोड केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, असे उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ.पी. सिंह म्हणाले होते.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बद्दल ती एक कट्टरपंथी इस्लामिक संस्था असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही धक्कादायक खुलासे झाले असून राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी संघटनेच्या इसिस आणि सिमीशी संपर्क शोधत आहेत. त्यात एजन्सीला काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याचे केरळ मॉडेल इसिससाठी काम करत होते. तेथून त्याचे सदस्य सीरिया आणि इराकमध्ये इसिसमध्ये सामील झाले, असे पीएफआय बद्दल म्हटले जात आहे.
Visit : bahujannama.com