नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF Nominee | जर तुम्ही नोकरदार कर्मचारी असाल तर तुम्हाला रिटायर्डमेंटनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो. EPF मेंबरचा मृत्यू किंवा इतर आकस्मिक घटनेसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी पीएफ अकाऊंटचा नॉमिनी (PF Nominee) बनवणे आवश्यक असते. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सर्व सदस्यांना भाविष्य निधी (PF) नामांकन सुविधा देते.
तुम्ही EPFO ची अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करून आपले ईपीएफ, ईपीएस नामांकन डिजिटल प्रकारे जमा करू शकता. EPF खातेधारक नवी PF नामांकन (PF Nominee) दाखल करून आपल्या PF खात्याच्या नॉमिनीत बदल सुद्धा करू शकतो.
EPFO सबस्क्रायबर्सला आपल्या PF नॉमिनीला बदलण्यासाठी EPFO ला विचारण्याची आवश्यकता नाही. खातेधारक नवीन नामांकन दाखल करून स्वताला असे करू शकतात.
#EPF सदस्य मौजूदा EPF/#EPS नामांकन को बदलने के लिए नया नामांकन दाखिल कर सकते हैं।#EPF Members can file new nomination to change existing EPF/#EPS nomination.#EPFO #Services #Pension #ईपीएप #पीएफ pic.twitter.com/rm3G2FaqKy
— EPFO (@socialepfo) November 18, 2021
EPFO ने आपल्या सबस्क्रायबर्सला यासंबंधी माहिती देण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट सुद्धा केले आहे. EPFO ने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, EPF सदस्य सध्याचे EPF/EPS नामांकन बदलण्यासाठी नवीन नामांकन दाखल करू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नवीन PF नामांकनात (PF Nominee) सांगितलेल्या नॉमिनीचे नाव अंतिम मानले जाईल. खातेधारकाने नवीन नामांकन केल्यानंतर पहिले नामांकन रद्द मानले जाईल. संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेवूयात…
स्टेप बाय स्टेप प्रॉसेस (PF Nominee)
– प्रथम EPFO ची वेबसाइट www.epfindia.gov.in वर व्हिजीट करा.
– तुमचा UAN No. आणि पासवर्ड नोंदवून लॉगइन करा.
– नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून ई-नॉमिनेशन ऑपशन निवडा.
– आता नवीन पेज ओपन होईल, तिथे मेंबरची पूर्ण माहिती जसे की, नाव, UAN, जन्म तारीख दिसेल.
– नंतर मुळ आणि सध्याचा पत्ता नोंदवून सेव्ह ऑपशनवर क्लिक करा.
– आता कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी YES च्या पर्यायावर क्लिक करून अॅड फॅमिली ऑपशनवर जा.
– तिथे नॉमिनीचे नाव, नाते, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर नोंदवा.
– नंतर नॉमिनेशन डिटेल्सवर जाऊन हे ठरवू शकता की कोणत्या नॉमिनीला EPF चा किती भाग दिला जावा.
– नंतर सेव्ह नॉमिनेशन ऑपशनवर क्लिक करा.
– यानंतर OTP जनरेट करावा लागेल, ज्यासाठी ई-साइन टॅबवर क्लिक करा.
– यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
– आलेला ओटीपी भरताच ई-नॉमिनेशन EPFO सोबत रजिस्टर होईल.
Web Title :- PF Nominee | you can change your pf nominee in an online way epfo is telling step by step process.