PF New Rules | मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर सुद्धा लागणार टॅक्स, जाणून घ्या कुणावर होणार परिणाम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF New Rules | नोकरी करणार्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देखील कर्मचारी असाल तर तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees’ Provident Fund Organization (EPFO) मध्ये खाते नक्कीच असेल. मात्र, आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात (PF Account) जमा होतो. पण आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून सध्याची पीएफ खाती दोन भागात विभागली जाऊ शकतात. (PF New Rules)
या पीएफ खात्यांवर आकारला जाईल Tax
गेल्या वर्षी सरकारने नवीन प्राप्तीकर नियम (New Income Tax Rule) अधिसूचित केले होते. आता या अंतर्गत पीएफ खाती दोन भागात विभागली जातील. यामध्ये कर्मचार्यांनी केंद्रात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान (Employee Contributions) दिल्यास पीएफ उत्पन्नावर कर आकारला जाईल. खरे तर, नवीन नियमांचा उद्देश उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून रोखणे हा आहे. (PF New Rules)
जाणून घ्या नवीन पीएफ नियमांच्या मुख्य गोष्टी –
– सध्याची पीएफ खाती करपात्र आणि अकरपात्र अशी विभागली जातील.
– नॉन टॅक्सेबल अकाऊंटमध्ये (Non Taxable Account) त्याच्या क्लोजिंग अकाऊंटचा समावेश असेल. कारण त्याची तारीख 31 मार्च 2021 असते.
– आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2022 पासून लागू केले जाऊ शकतात.
– वार्षिक रू. 2.5 लाखांपेक्षा जास्त कर्मचार्यांच्या योगदानातून PF उत्पन्नावर नवीन कर लागू करण्यासाठी IT नियमांतर्गत नवीन कलम 9 डी समाविष्ट केले गेले आहे.
– करपात्र व्याजाच्या गणनेसाठी विद्यमान पीएफ खात्यामध्ये दोन स्वतंत्र खाती देखील तयार केली जातील.
या करदात्यांवर होणार नाही परिणाम
हा नवीन नियम लागू झाल्यानंतर, पीएफ ग्राहकांना 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेचा फायदा सद्यांना होईल. मात्र लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार नाही. याचा प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचार्यांवर परिणाम होईल. म्हणजेच तुमचा पगार कमी किंवा सरासरी असेल, तर तुम्हाला या नवीन नियमात काहीही फरक पडणार नाही.
Web Title :- PF New Rules | pf new rules pf accounts to be split into two from 1 april 2022 see here details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ची ‘गेम’ करणारे 6 जण ‘गोत्यात’, खूनाचं कारण आलं समोर
Comments are closed.