नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएफ फंडमध्ये जमा रक्कम तुमच्यासाठी एक मोठी रक्कम असते. टॅक्स आणि गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी या गोष्टीवर जोर देतात की, पीएफ फंडमध्ये जमा रक्कम अतिशय अपरिहार्य स्थितीतच काढावी. तज्ज्ञांचा सल्ला हा असतो की, पीएफ खाते किंवा पीएफ फंडात जमा रक्कमेवर अनेक प्रकारचे एक्सक्लूझिव्ह लाभ मिळतात, जे अन्य फंड्समध्ये कमी दिसून येतात.
पीएफशी संबंधी खास फायदे :
1 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ खात्यात अनेक अन्य स्कीमच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. ईपीएफओ प्रत्येक वर्षासाठी पीएफ रक्कमेवर मिळणार्या व्याजाची घोषणा करते. चालू आर्थिक वर्षात ईपीएफओने 8.5 टक्केच्या दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.
2 या स्कीमवर प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करसवलत मिळते.
3 नोकरी जाणे आणि अन्य गरजांसाठी पीएफमध्ये जमा रक्कमेतून आंशिक रक्कम काढण्याची परवानगी मिळते. सरकारने कोविड महामारीच्या वेळीसुद्धा आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली होती.
4 या स्कीम अंतर्गत पेन्शन स्कीम, 1995 (ईपीएस) अंतर्गत आजीवन पेन्श मिळते.
5 जर ईपीएफओचा सदस्य फंडात नियमितपणे अंशदान करत असेल, तर तर त्याच्या मृत्यूच्या स्थितीत कुटुंबातील सदस्य इन्श्युरन्स स्कीम, 1976 चा लाभ घेऊ शकतात. ही रक्कम लास्ट सॅलरीच्या 20 पटीच्या बरोबरीने असू शकते. ही रक्कम कमाल 6 लाखांपर्यंत असू शकते.
तुम्हाला हे माहित असेल की, कंपनी आणि कर्मचार्यांना कर्मचार्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्केच्या बरोबरीची रक्कम पीएफ फंडात जमा करावी लागते. ईपीएफ अंतर्गत नोंदणीकृत कंपनीचे कर्मचारीच पीएफ फंडात आपल्यावतीने गुंतवणूक करू शकतात.