नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार लवकरच पीएफ खात्यात (PF Account) व्याज ट्रान्सफर करणार आहे. या महिन्यात हे पैसे येऊ शकतात. शिवाय सरकारने 8.5 टक्केच्या दराने व्याज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, 1 सप्टेंबरपूर्वी ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक (EPFO Link With Aadhaar) केला नाही तर खात्यात कंपनीकडून येणारे योगदान रोखले जाईल. शिवाय तुम्हाला पीएफचे (PF Account) पैसे देखील काढता येणार नाही. यासाठी लवकरात लवकर ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक करा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PF Account सोबत Aadhaar असे करा Link –
– सर्वप्रथम https://unifiedportal mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंकवर क्लिक करा.
– आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
– यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC Option सिलेक्ट करा.
– अकाऊंटसोबत आधारला लिंक करण्याचे अनेक डॉक्युमेंट्स दिसतील.
– आधार ऑपशनवर क्लिक करा, आधार नंबर आणि नाव टाईप करून Service वर क्लिक करा.
– यानंतर माहिती सुरक्षित होईल आणि आधार UIDAI सोबत डाटा व्हेरीफाय होईल.
– KYC कागदपत्र योग्य असल्यास आधार EPF अकाऊंटसोबत लिंक होईल. Verify लिहून येईल.
ऑफलाइन असे करा लिंक –
– Aadhaar Seeding Application फॉर्म भरा.
– मागिलेल्या सर्व डिटेल्ससह फॉर्ममध्ये UAN आणि Aadhaar नोंदवा.
– फॉर्मसोबत यूएएन, पॅन आणि आधारची सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडा.
– हे ईपीएफओ किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आऊटलेच्या कोणत्याही फील्ड ऑफिसमध्ये जमा करा.
– प्रॉपर व्हेरिफिकेशननंतर आधार ईपीएफ अकाऊंटसोबत जोडले जाईल.
– यासंबंधीचा मेसेज रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल.
Web Title :- pf account epfo link with aadhaar otherwise you can not withdrawl monefy from provident fund
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात
Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट