पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तेल कंपन्यां पेट्रोल, डिझेल ( Petrol Diesel rates ) च्या दरात सातत्याने वाढ करीत असून या महिन्यातील ४ मे पासून सुरु झालेली भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. आज तेल कंपन्यांनी या महिन्यातील १५ वी भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. आज पुण्यातील पेट्रोलचा दर ९९.८७ रुपये प्रति लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात आज लिटरमागे २९ पैशांची वाढ केली आहे. आता डिझेलचा दर ९०.४४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात ही प्रति लिटर २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर १०३.५५ रुपये लिटर झाला आहे.