पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारचा अडसर दूर झाल्यानंतर आता तेल कंपन्यांनी आपला मधल्या काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ करण्याचा निर्णय सोमवारीही कायम ठेवला. आज देशातील पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांनी महाग झाले.
पुणे शहरात पेट्रोलचा दर ९७.३१ रुपये होता तो आज ९७.५६ रुपये झाला आहे. डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल ३४ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यातील डिझेलचा दर ८७.१७ वरुन ८७.५१ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी पॉवर पेट्रोलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.२४ रुपये इतका झाला आहे.