नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे सध्या सणासुदीच्या काळात ऑक्टोबरमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंत १.३४ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर आजच्या डिझेलच्या दरात प्रति लिटर १.३२ रुपयांनी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कच्चे तेल ५ टक्क्यांनी स्वस्त झाले असून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होत असल्याचे समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरला दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७४.६१ रुपये होती. जी आता २१ऑक्टोबरला ७३.२७ रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रति लिटर ६७.४९ रुपयांवरुन ६६.१७ रुपये झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार पेट्रोल डिझेलच्या आजच्या नव्या किंमतीनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे ७३.२७ रुपये, ७५.९२ रुपये, ७८.८८रुपये आणि ७६.०९ प्रति लिटर झाले आहेत.
– SMS च्या माध्यमातून ग्राहक विशिष्ट नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून किंमतीची अपडेट तपासू शकतात आणि त्यांना सध्याच्या किंमतीबद्दल संदेशाद्वारे माहितीदेखील दिली जाईल.
– दरम्यान , SMS पाठवण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही पेट्रोल पंपावरुन डीलर कोड घ्यावा लागेल.
– इंडियन ऑइल ग्राहक RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहकांना RSP <डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवावे लागेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPRISCE <विक्रेता कोड> ९२२२२०११२२ पाठवावे लागेल.
Visit : bahujannama.com