पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Petrol Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत सलग तिसर्या दिवशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर १०७.७१ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)
पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली असून आता डिझेलचे दर शंभरीच्या दिशेन घोडदौड करु लागले आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात डिझेलचा दर ९६.१९ रुपये लिटर झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर २४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर १११.३९ रुपये लिटर झाला आहे.
२७ सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात सुरुवात झाली आहे़ तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल तब्बल ८८ पैशांनी तर डिझेल १.१९ रुपयांनी महागले आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Today in pune.
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई