बहुजननामा ऑनलाईन – देशभरातील डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने वाढलेल्या दराबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता. २१) पेट्रोलच्या किमतीत २४ ते ३१ पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात २४ ते २६ पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. तर शुक्रवारी (ता. २०) पेट्रोलच्या किमतीत ३४ ते ३७ पैसे प्रति लीटर आणि डिझेल २८ ते ३० पैसे प्रति लीटरने वाढ झाली. ही वाढ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये नोंदविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७३.३५ रुपये आहे. तर शुक्रवारी ती ७३.०६ रुपये प्रति लीटर इतकी होती. यानंतर आज (ता.२१ ) डिझेलचा दर ६६. ५३ रुपये प्रति लीटर झाला जो शुक्रवारी (ता.२०) ६६.२९ रुपये प्रति लीटर इतका होता.
मुंबईत एक लीटर पेट्रोलच्या दरात २५ पैशांनी वाढ होऊन तो दर ६९. ७९ रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईत शुक्रवारी (ता. २१) डिझेलचा दर ६९. ५४ रुपये प्रति लीटर होता.त्यानंतर चेन्नईत एक लीटरचा दर ३१ पैसे प्रति लीटरने वाढून तो ७६.२४ रुपये प्रति लीटर झालाय. तर डिझेल २६ पैशांनी वाढलंय. चेन्नईत एक लीटरचा डिझेलसाठी आता७०.३३ रुपये मोजावे लागणार आहे.
पेट्रोल – डिझेलच्या किमतीं दररोज सकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये एक्ससाईज कर, डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या विशेष नोंदणीकृत क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास आपल्या शहरातील इंधनाच्या दरांची माहिती मिळू शकते. ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध होण्यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्या. ही एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा