नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) वाढ अजूनही सुरूच आहे. सरकारने आज 8 जुलै गुरुवारी पुन्हा पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढवले. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लीटरवर पोहचली आहे. तर डिझेलमध्ये 9 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलचा भाव 89.62 रुपये प्रति लीटर आहे.
सध्या तरी पेट्रोलच्या किंमतीत (Petrol Price) दिलासा मिळणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. इंधन महाग होत असल्याने महागाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. सर्वसामान्यांचे जगण अवघड होऊन बसले आहेत. क्रूड प्रॉडक्शनबाबत (Crude production)
ओपेक प्लस देशांच्या बैठकीत सहमती होऊ शकली नाही. यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये (International market) क्रूडच्या किंमतीत तेजी जारी आहे. यामुळे स्थानिक बाजारात किंमतीत वाढ सुरूच राहील असा अंदाज आहे.
4 मे रोजी पासून सातत्याने इंधनाच्या किंमती वाढत आहेत. 2021 मध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंत 15 टक्के वाढली आहे. या वाढीने देशात सुमारे 10 पेक्षा जास्त राज्यांत पेट्रोलच्या किंमती 100 रुपयाच्या पुढे गेल्या आहेत. यामध्ये राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, ओडिसा, तमिळनाडु आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे. आता यात दिल्लीचा सुद्धा समावेश झाला आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर (Petrol-Diesel Price on 8 July 2021)
- दिल्ली – 100.56 / 89.62
- मुंबई – 106.59 / 97.17
- चेन्नई – 101.36 / 94.17
- कोलकाता – 100.54 / 92.53
- जयपुर – 107.34 / 98.73
- लखनऊ – 97.69 / 90.01
- पाटना – 102.71 / 95.02
- नोएडा – पेट्रोल 97.80 रुपये और डीजल 90.09 रुपये प्रति लीटर
web title: Petrol-Diesel Price Today | For the second day in a row, petrol became costlier by 35 paise, with prices likely to skyrocket further.
Diesel Price in Pune Today | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसर्या दिवशी भाववाढ !