नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याच्या भावात दिवसंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे नागरिकांना आणखी एक धक्का बसणार आहे. पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांच्या संघटनेने उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असून याचा परिणाम पेट्रोल किमतीवर होणार आहे.
ओपेक करणार दिवसाला ५ लाख बॅरल उत्पादनात कपात :
सर्व सदस्यांच्या बैठकीत ओपेकने कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन पाच लाख बॅरल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेकने देशांनी कंसाच्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी घसरण लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमती आणि ओपेकच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना पुन्हा वाढत्या किमतीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पेट्रोल-डिझेलमध्ये २ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता :
केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, ओपेकच्या या निर्णयानंतर जर कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल ४ डॉलरची वाढ झाली आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये जास्त चढ-उतार होताना दिसले. त्यामुळे याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिका वाढवणार उत्पादन :
दरम्यान, ओपेक देशांनी उत्पादन कमी केल्यावरही अमेरिकेने आधीच २०२० मध्ये उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमतीवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. भू-राजकीय अस्थिरता वाढल्यास त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होईल, असेही केडिया यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com