पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका दररोज सुरुच असून आज सलग तिसर्या दिवशी कायम राहिला आहे.तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे पुण्यातील दर ११३.९४ रुपये लिटर इतका झाला (Petrol Diesel Price Pune) आहे.
डिझेलच्या दरातही लिटरमागे ३७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे पुण्यातील दर १०३.३५ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलमध्ये आज ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११७.६२ रुपये लिटर झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यापूर्वी तेल कंपन्यांनी मे, जून महिन्यात सातत्याने दरवाढ केली होती. त्यावेळी दररोज केल्या जाणार्या दरवाढीपेक्षा ऑक्टोबर महिन्यात झालेली दरवाढ मोठी ठरली आहे.
ऑक्टोबर महिन्यात आजअखेर पेट्रोलच्या दरात लिटरमध्ये ६.७९ रुपये, डिझेलमध्ये ७.७८ रुपये आणि पॉवर पेट्रोलमध्ये ६.७० रुपये वाढ झाली आहे.
web title: Petrol diesel price pune petrol diesel price pune today 2.
Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’