नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये (International market) कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. परंतु, देशांतर्गत असणाऱ्या तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर मध्ये ९०.७८ रुपये आणि डिझेलचा दर ८१.१० रुपये इतका होता. त्याचबरोबर दिल्लीच्या तुलनेने मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर मात्र अधिक आहे. पेट्रोलचा दर प्रति लिटर मध्ये ९७.१९ रुपये आणि डिझेलचा दर ८८.२० रुपये इतका होता. परंतु, याआधी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमंती कमी केले होते.
कच्या तेलाच्या दरात घसरण-
युरोपात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. मागील सत्रात बेंचमार्क कच्च्या तेलाचे दर ४.३ टक्क्यांनी घसरले होते. ब्रेंट क्रूड (Brent crude oil) २.७९ डॉलरच्या घसरणीबरोबर ६१.६२ डॉलर प्रती बॅरलवर आले होते. यूएस वेस्ट टॅक्सस इंटरमीडियएट (US West Texas Intermediate)चे दरही ५.२ टक्क्यांनी घसरून ५७.९८ डॉलर प्रती बॅरलवर आले होते.
दरम्यान, २ दिवसामध्ये दिल्लीमध्ये पेट्रोल ३९ पैशांनी तर डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झाले होते. तर मागील महिन्यात सलग १६ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. तसेच जवळपास सगळ्या शहरांत पेट्रोल-डिझेल या इंधनांचे दर सातत्याने वाढत होते. तसेच फेब्रुवारीमध्ये पेट्रोलच्या किमंतीत सलग १६ दिवस वाढ होत होती. या १६ दिवसांमध्ये पेट्रोल ०४.७४ रुपयांनी महागले. मुंबईमध्ये पेट्रोल ९७.५७ रुपयांवर पोहोचले होते. भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोल (XP Petrol) १०२.१२ रुपये लिटर या किमतीने विकले जात होते.