नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी इंधन कंपन्यांनी आज (रविवार) चे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) रेटमध्ये वाढ झाली आहे. एक दिवस दिलासा दिल्यानंतर आज (6 जून) दोन्ही इंधन आणखी महागले आहे. स्थानिक बाजारात डिझेलचा दर 29 पैसे प्रति लीटर तर पेट्रोलचा दर 27 पैसे प्रति लीटरने वाढवला आहे. दिल्लीच्या बाजारात आज पेट्रोल 95.03 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.95 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे.
प्रमुख महानगरांमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे Petrol-Diesel दर
शहर – पेट्रोल – डिझेल
दिल्ली – 95.03 – 85.95
मुंबई – 101.25 – 93.10
कोलकाता – 95.02 – 88.80
चेन्नई – 96.47 – 90.66
शनिवारी स्थिर होते दर
सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी 5 जूनला पेट्रोल-डिझेलच्या Petrol-Diesel दरात कोणताही बदल केला नव्हता. दिल्ली बाजारात पेट्रोल 94.76 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.66 रुपये प्रति लीटरवर होते. 04 जूनला पेट्रोल 27 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग झाले होते. तर, यापूर्वी गुरुवार आणि बुधवारी सुद्धा इंधनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.