पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price | तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (petrol diesel price) केली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ करण्यात आली होती. शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता १०१.९७ प्रति लिटर झाला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर आज १०२.३० रुपये लिटर, चेन्नईमध्ये ९७.४३ रुपये, दिल्लीमध्ये ९६.१२ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. आता डिझेल ९२.६० रुपये लिटर झाले आहे. मुंबईत डिझेलचा दर ९४.३९ रुपये लिटर झाला आहे. चेन्नईत ९१.६४ रुपये, कोलकत्ता ८९.८३ रुपये, दिल्लीत ८६.९८ रुपये लिटर झाला आहे.
४ मे पासून पेट्रोल व डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत आहे. १२ जूनपर्यंत तब्बल २३ वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल व डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत. ४ मे ते ११ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ५.४५ रुपये लिटर आणि डिझेलच्या दरात ६.०२ रुपये लिटर महागले आहे.