मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price |पश्चिम बंगाल(West Bengal) सह पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरूच आहे. जून महिन्यात तब्ब्ल १६ वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. मंगळवारी केलेल्या दरवाढीनंतर (Petrol-Diesel Price) पेट्रोल ३४ पैसे आणि डिझेल ३० पैशानी महागले आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे तर डिझेलही त्याच मार्गाने जात असल्याचे चित्र आहे गेल्या महिनाभराचा विचार केला तर पेट्रोल ८.४० आणि डिझेल ८.४७ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नई(Mumbai, Ratnagiri, Aurangabad, Jaisalmer, Ganganagar, Hyderabad, Leh, Baswada, Indore, Jaipur, Bhopal, Gwalior, Guntur, Kakinada, Chikmagalur, Shivamogga, Chennai)चा समावेश आहे.
petrol and diesel prices hike in fuel price know today’s rate
महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचे दर
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई १०४.९० ९६.७२
पुणे १०४.४८ ९४.८३
नाशिक १०५.२४ ९५.५६
औरंगाबाद १०६.१४ ९७.९६
कोल्हापूर १०५.०० ९५.३५
पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर दररोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. त्यानुसारच मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल-डिझेलची विक्री होते. आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मोबाईलवर एसएमएस पाठवून मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. हा कोड तुम्हाला इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून उपलब्ध होईल.
web title: Petrol-Diesel Price | Fuel price hike continues, 16th increase in month; Find out today’s rates.
Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी